सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला तपासणीसाठी थांबविले अन् गाडीत सापडले...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने महिंद्रा पीकअप गाडी निघाली अन्...

बांदा (सिंधुदुर्ग) : गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने महिंद्रा पीकअप मधून नेण्यात येणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीवर बांदा पोलिसांनी कारवाई करत १ लाख ३ हजार २०० रुपये किमतीच्या दारुसह एकूण ६ लाख ३ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज सकाळी ७ वाजता बांदा-दोडामार्ग रस्त्यावर डेगवे स्थापेश्वर मंदिर समोर करण्यात आली.याप्रकरणी गणेश प्रकाश सावंत (वय २८, रा. कुणकेरी, ता. सावंतवाडी) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी...

गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपला (एमएच ०७- १३५६) डेगवे येथे पोलीस हवालदार मनीष शिंदे यांनी तपासणीसाठी थांबविले. त्यावेळी गाडीच्या पाठीमागील हौद्यात गैरकायदा, बिगर परवाना गोवा बनावटीच्या दारूचे खोके आढळले.

हेही वाचा- ब्रेकिंग - कोल्हापूरमधील आयसीयूतील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

गडहिंग्लज तालुका हादरला 

वाचा सविस्तर...

पोलिसांनी दारू सर्व जप्त करत चालकावर अटकेची कारवाई केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश भोई, मनीष शिंदे, रामचंद्र तेली यांनी केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banda police seized alcohol worth Rs 1 lakh 3 thousand 200 and a total of Rs 6 lakh 3 thousand 200 worth of liquor