निवडणुकीत राणेंना पक्षाची गुप्त माहिती पुरविणारे वैभव नाईकच

आमदार वैभव नाईक यांनी गद्दारीवर बोलू नये : राणे
If Nilesh Rane is a Candidate in front of Vaibhav Naik Sindhudurg News
If Nilesh Rane is a Candidate in front of Vaibhav Naik Sindhudurg NewsEsakal

मालवण (सिंधुदुर्ग) : आमदार बनल्यावर विकासाची कोणतीही कामे न करणारे वैभव नाईक हे २०२४ च्या निवडणुकीत आमदार म्हणून सोडाच, त्यापुढे कोणत्याच निवडणुकीत जनतेतूनही निवडून येणार नाहीत, असे प्रतिपादन भाजपचे राज्य सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे ( Nilesh Rane)यांनी येथे केले. यावेळी येत्या पालिका आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Bank Election) भाजप पक्षाचा गुलाल उधळेल, फटाके फुटतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

येथील भाजपा कार्यालयात मालवणातील भाजप कार्यकर्त्यांची काल (ता.२) उशिरा बैठक पार पडली. या बैठकीत पालिका निवडणूक आणि जिल्हा बँक संचालक पदाची निवडणूक याबाबत आढावा घेण्यात आला. व्यासपीठावर तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, नगरसेवक गणेश कुशे, बाबा परब, विजय केनवडेकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी विजय केनवडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मालवण भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड झालेल्या ललित चव्हाण या युवा कार्यकर्त्याचा नियुक्ती पत्र देताना श्री. राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राणे म्हणाले, "तालुक्याबरोबरच जिल्ह्यातही भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी भाजप युवा कार्यकर्त्यानी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन जोमाने काम करावे. ज्येष्ठानी केलेल्या कार्याचा पाठलाग करून विकास प्रक्रियेत आपली मोलाची भूमिका बजवावी. आमदार वैभव नाईक यांनी गद्दारीवर बोलू नये ते काँग्रेसचे होते. राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेत उडी मारली. नाईक हे मूळ शिवसैनिक नाहीत. त्यामुळे त्यांनी गद्दारीवर बोलूच नये. प्रत्येक निवडणुकीत राणेंना पक्षाची गुप्त माहिती पुरविणारे नाईकच होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com