सिंधुदुर्ग बँकेचे बेपत्ता मतदार घरी परतले ; कोणाचाही दबावही नसल्याचे केले कबूल l Pramod Waingankar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhudurg Bank Election

सिंधुदुर्ग बँकेचे बेपत्ता मतदार प्रमोद वायंगणकर घरी परतले

कणकवली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील (Sindhudurg Bank Election) तळेरे विकास सेवा संस्थेचे मतदान असलेले प्रमोद वायंगणकर (Pramod Waingankar)आता आपल्या घरी परतले आहेत. आज त्यांनी येथील पोलीस ठाण्यात हजेरी लावली.आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपण पुणे (Pune) येथे गेलं असल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे.

हेही वाचा: मुंबई उच्च न्यायालयात नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज दाखल

बँक निवडणूक नुकतीच झाली या निवडणुकीतील कणकवली (Kankavli)विकास संस्था मतदार संघात मधून प्रमोद वायंगणकर यांना मतदानाचा हक्क होता, मात्र मतदाना पूर्वी 20 डिसेंबरला प्रमोद वायंगणकर हे बेपत्ता झाले होते अशी माहिती त्यांचे भाऊ शरद वायंगणकर यांनी येथील पोलिसात नोंदवली होती.

शिवसेनेच्या वतीने निवेदनही देण्यात आले होते. प्रमोद वायगंकर बेपत्ता झाल्यामुळे उलटसुलट चर्चाही रंगू लागल्या होत्या. बँकेचे मतदान 30 डिसेंबरला झाले 31 ला निकाल जाहीर झाला. प्रमोद वायंगणकर हे आज येथील पोलिस ठाण्यात हजर झाले. बँकेच्या कर्जाला कंटाळून आपण पुणे येथे गेलो होतो असे त्यांनी पोलिस जबाबात म्हटले आहे. आपल्यावर कोणाचाही दबावही नसल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top