निषेधाचे बॅनर रातोरात झाले गायब ; वाद नेमक्‍या कोणत्या थराला जाणार ?

banner of shivsena for opposite party vansihed in rajapur ratnagiri
banner of shivsena for opposite party vansihed in rajapur ratnagiri
Updated on

राजापूर (रत्नागिरी) : ठोक निधीअंतर्गत प्रस्तावित केलेल्या विकासकामांची बॅनरबाजी करून सेनेने शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे. ठोक निधीच्या अनुषंगाने बॅनरबाजीतून शिवसेनेने सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह भाजपचा केलेला निषेध शहर आणि पालिकेच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हे बॅनर रात्रीच्या रात्री गायब झाल्याने आता उलटसुलट चर्चेला चालना मिळाली आहे. 

शासनाकडून ठोक निधींतर्गंत शहराला विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, मंजूर झालेली विकासकामे नेमकी कोणाकडून करायची, नगर पालिकेने स्वतः करायची की सार्वजनिक बांधकाम विभागाने, यावरून सत्ताधारी आघाडी आणि विरोधी गट असलेल्या शिवसेनेमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली. शासनाकडून मंजूर झालेल्या सुमारे पाच कोटींच्या ठोक निधीच्या मुद्‌द्‌यावरून नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेमध्ये विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने सभात्याग केला होता. 

ठोक निधीतर्गंत करावयाच्या यादीतील विकासकामांच्या समावेशावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद रंगला. हा वाद जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टामध्ये गेला. जिल्हाधिकाऱ्यांनीही या कामांबाबत काही निर्देश दिले आहेत. त्या संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागण्यासाठी अपील करण्याबाबतचा विषय नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेमध्ये चर्चेस आला होता. त्या वेळी विरोधकांनी सभात्याग करून पालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यानंतर दिवसागणिक हा वाद अधिकच चिघळत जाऊन त्याचे रूपांतर आता बॅनरबाजीमध्ये झाले आहे. 


नेमक्‍या कोणत्या थराला जाणार 

शिवसेनेने ठोक निधीसंबंधित ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. त्या बॅनरवर मंजूर झालेल्या विकासकामांच्या यादी छापून आणत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला आहे. ठोक निधीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेला वाद आता नेमक्‍या कोणत्या टोकाला जाणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हे बॅनर रात्रीच्या रात्री गायब झाल्याने ही बॅनर नेमके कोणी काढले? अशी उलटसुलट चर्चा शहरामध्ये रंगली आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Citizens have demanded strict action against those accused of profiteering during the flood crisis.
White Chanchu Vala Albino Beaked Worm Snake
Mumbai Goa Highway latest construction update
Tamhini Ghat closed due to heavy rain
Marathi News Esakal
www.esakal.com