mahajan family ganeshotsav
sakal
दापोली - बाजारात विविध आकार, रंग आणि आकर्षक सजावटीच्या गणेशमूर्तींची रेलचेल असताना, आपल्या परिसरातील डोंगरातील माती आणून त्याच मातीपासून घरच्या घरी बाप्पाची मूर्ती घडविण्याची आगळीवेगळी परंपरा दापोली तालुक्यातील कोळथर येथील महाजन कुटुंबाने तब्बल चार पिढ्यांपासून जपली आहे. सुमारे शंभर वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेत श्रद्धेबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि आपल्या मातीशी असलेले नातेही जपले जात आहे.