भारतीय स्ञीने अमेरीकेत जागवली संवेदना....

प्रमोद हर्डीकर
शुक्रवार, 22 मे 2020

भारतीय बटाटा वडा विक्रीतून अशी ही सेवा...

साडवली (रत्नागिरी) :  भारतीय लोक संवेदना जपणारे,जागवणारेअसेच आहेत.आपली मातृभुमी सोडुन परदेशात नोकरीनिमित्त असले तरी तीथेही हे लोक मदत करुन आपली संस्कृती जोपासताना दिसतात.अशीच एक संवेदना जागवणारी घटना घडली आहे .देवरुखचे सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ.सुरेश जोशी यांचा मुलगा सलील व सुन सौ.प्राची अमेरीकेत डेल्लास येथे वास्तव्यास आहेत.अमेरीकेत कोरोनाचे थैमान सुरुचआहे.नाॅर्थ अमेरीकेत गोर गरीब मजुरांसाठी अन्न पुरवणारी नाॅर्थ टेक्सास फुड बॅंक नावाची स्वंयसेवी संस्था आहे.या संस्थेमार्फत आजवर अनेकवेळा सलील व प्राची यांनी मदत केली आहे.

हेही वाचा- करवीर तालुक्‍यातील 25 गावांची कोरोनाबाबत अशी दक्षता -

सौ.प्राची या केटरींगचा व्यवसाय करतात.याच माध्यमातुन त्यांनी शनिवार  व रविवार असे दोन दिवस भारतीय पदार्थ म्हणजे बटाटा वडा विक्रीस ठेवणार असे तीथे जाहीर केले आहे .या बटाटेवडे विक्रीतुन जमा होणार्‍या रकमेतुन ७५% रक्कम त्या नार्थ टेक्सास फुड बॅंकेला देणार आहेत.भारतीय स्ञीची मदत करण्याची हि संवेदना अमेरीकेतही जागवली गेली आहे.

हेही वाचा-मातोश्रीवर बसून मुख्यमंत्र्यांना अडचणी कशा समजणार ? त्यांनी रस्त्यावर उतरावे - चंद्रकांत पाटील -

बटाटा वडा मिळेल अशी जाहिरात केल्यावर सलील व प्राची यांचेकडे ७०० वड्यांची आॅर्डर बुक झाली आहे.यामधुन भारतीय चलनाप्रमाणे गणित मांडल्यास ५० ते ६० हजार रुपये जमा होणार आहेत.यामधील ७५% रक्कम हे भारतीय दांपत्य फुड बॅंकेला दान करणार आहेत.सलील व प्राची यांच्या या अशा आगळ्या वेगळ्या मदतीबाबत देवरुख मध्ये विशेष कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: batata wada pay 75% of the sale price