esakal | त्याने बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावून केले शूट आणि.....
sakal

बोलून बातमी शोधा

bathroom camera case in ratnagiri kokan marathi news

स्नानगृहात छुपा कॅमेरा लावून शूटिंगचा प्रयत्न; एक अटकेत महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई..

त्याने बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावून केले शूट आणि.....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : स्नानगृहात छुपा कॅमेरा लावून शूटिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली. शुभम तुळशीदास गावडे (वय २३, रा. सुपलवाडी, नाचणे) असे संशयिताचे नाव आहे. 

हेही वाचा- बेडरुमध्ये बायको, दोन मुलांना मारुन तो हाॅलमध्ये आल्यानंतर त्याने...


ही घटना रविवारी (ता. १) रात्री दहापूर्वी निदर्शनास आली. घराच्या बाहेरील बाजूला असलेल्या स्नानगृहाचा महिला वापर करीत होती. हे संशयिताला माहीत असताना त्याने छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ शूटिंग करता यावे, म्हणून कॅमेरा स्नानगृहाच्या सिमेंट पत्र्याचे छत व लोखंडी अँगलमध्ये लावला.

हेही वाचा- बापरे ! कोरोना पोचला बंगळुरात....

 त्याला हे माहित होते..

या प्रकरणी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला होता. पोलिस उपनिरीक्षक डी. डी. मुसळे तपास करीत होत्या. पोलिसांनी काल (ता. २) संशयितास अटक केली. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

loading image
go to top