सावधान ! एटीएम कार्ड, ओटीपीची विचारून ग्राहकांची लुट 

Be careful About Robbery of customers by asking for ATM card OTP
Be careful About Robbery of customers by asking for ATM card OTP
Updated on

मालवण ( सिंधुदुर्ग) - सध्या ग्राहकांची ऑनलाईन वरून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. मोबाईलवरून ग्राहकांशी संपर्क साधून त्यांच्या एटीएम कार्ड नंबर, ओटोपी नंबर विचारून अनेक ग्राहकांची आर्थिक लूट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणालाही आपल्या एटीएम कार्ड, ओटीपी याची माहिती देऊ नये, असे आवाहन येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक मंदार पाटील यांनी केले. 

आरबीआयच्या निर्देशानुसार येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र मालवण शाखेत आर्थिक साक्षरता आठवड्यानिमित्त ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शाखा व्यवस्थापक मंदार पाटील बोलत होते. याप्रसंगी उपव्यवस्थापक छवि शर्मा, अतुल साळुंखे, कर्मचारी राजरूप केळुसकर, उमेश पाटील, सुगंधा केळकर, उमेश खोत उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांनी बाह्यस्वरूपाच्या वित्तीय संस्था किंवा सावकार यांच्याकडून कर्ज न घेता रिझर्व्ह बॅंकेच्या वित्तीय संस्थांच्या विविध सुविधांचा लाभ घ्यायला हवा. लाभार्थ्यांनी आपल्या व्यवसायासाठी जेवढी गरज आहे तेवढेच कर्ज बॅंकांकडून घ्यायला हवे. घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड केल्यास बॅंकेत त्या ग्राहकाची पत सुधारण्यास मदत होईल. कर्जाची नियमित परतफेड न केल्यास त्याची माहिती सीबील कडे जाते. परिणामी भविष्यात त्या लाभार्थ्यांला बॅंकांकडून कर्ज घेता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत आवश्‍यक तेवढेच कर्ज घेत त्याची नियमित परतफेड करण्यावर भर द्यायला हवा असे श्री. साळुंखे यांनी सांगितले. 

सध्या ग्राहकांची ऑनलाईन वरून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. मोबाईलवरून ग्राहकांशी संपर्क साधून त्यांच्या एटीएम कार्ड नंबर, ओटोपी नंबर विचारून अनेक ग्राहकांची आर्थिक लूट झाली आहे. प्रत्यक्षात कोणतीही बॅंक ग्राहकाला फोन लावून त्याच्या एटीएम क्रमांक किंवा अन्य कोणतीही माहिती विचारत नाही. याबाबत बॅंकेकडून ग्राहकांना मेसेजद्वारे सातत्याने कळविलेही जाते. मात्र बऱ्याच ग्राहकांना याची माहिती नसल्याने त्यांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक होते. त्यामुळे ग्राहकांनी कोणालाही आपल्या एटीएम कार्ड, ओटीपी याची माहिती देऊ नये. असे आवाहन श्री. पाटील, श्रीमती शर्मा, श्री. साळुंखे यांनी ग्राहकांना केले. 

ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर केल्यास त्यांचा बॅंकेत जाणारा वेळ वाचू शकेल. त्यामुळे ग्राहकांनी एटीएम वापरावर भर द्यावा, असे आवाहनही करण्यात आले. ग्राहकांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसन बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com