
कैलास म्हामले
कर्जत : रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जत रेल्वे स्थानकावर एका महिला प्रवाशाने घेतलेल्या वडापावमध्ये चक्क साबणाचा तुकडा आढळला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.