रेल्वेने जाताना एक तास आधी स्थानकात उपस्थित रहा; प्रशासनाची सुचना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

कोकण रेल्वे मार्गावर 26 सप्टेंबरपासून तुतारी तर 2 ऑक्‍टोबरपासून राजधानी या दोन गाड्या धावणार आहेत. या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची रेल्वेमध्ये चढण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक प्रवाशाचे तापमान तपासून मगच प्रवेश दिला जाईल.

रत्नागिरी -  कोकण रेल्वे मार्गावर तुतारी आणि राजधानी या दोन गाड्या धावणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे. पण या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या निर्धारित वेळेत, किमान एक तास आधी रेल्वे स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे प्रत्येक प्रवाशांची ट्रेनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तपासणी केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

कोकण रेल्वे मार्गावर 26 सप्टेंबरपासून तुतारी तर 2 ऑक्‍टोबरपासून राजधानी या दोन गाड्या धावणार आहेत. या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची रेल्वेमध्ये चढण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक प्रवाशाचे तापमान तपासून मगच प्रवेश दिला जाईल. शासनाच्या निर्धारित तापमानापेक्षा अधिक तापमान आढळल्यास त्या व्यक्तीला ट्रेनने प्रवास करता येणार नाही. प्रवाशांची संख्या लक्षात घेता किमान एक तास आधी रेल्वे स्थानकात उपस्थित रहावे असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे. त्याबरोबर स्थानक परिसरात वावरताना प्रवाशांची परस्परात सुरक्षित अंतर ठेवून राहणे बंधनकारक आहे. आयत्या वेळी येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सूचना महत्वाची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून ही सगळी पावले कोकण रेल्वेकडून उचलली आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be Present At Station An Hour Before Departure By Train Administration Notice