भडकंब्यातील जनतेला लाखो रुपयांचा लाभ 

Benefit of lakhs of rupees to the people of Bhadkamba
Benefit of lakhs of rupees to the people of Bhadkamba
Updated on: 

संगमेश्‍वर - कामगार कल्याण मंडळामार्फत भडकंबा व पेठवाडीतील पुरुष व महिला कामगारांना सुमारे 5 लाख रोख स्वरूपात व अत्यावश्‍यक साहित्य यांचे वाटप करण्यात आले. 

या योजनेंतर्गत 125 पुरुष व 100 महिला कामगारांना या योजनेचा लाभ मिळाला. शिवसेनेचे युवानेते प्रशांत उर्फ बापू शिंदे यांनी त्यासाठी प्रयत्न केले. साहित्यामध्ये हेल्मेट, बॅटरी, सेफ्टी शूज, रिफ्लेक्‍टिव्ह जाकीट, हॅंडग्लोव्हज, पत्र्याची पेटी, जेवणाचा डबा, वॉटर बॅग, चटई इत्यादी 14 वस्तूंचे वाटप प्रत्येक कामगाराला देण्यात आले. या अगोदर गावातील 220 लाभार्थ्यांना मोफत गॅस व शेगडीचे वाटपदेखील बापू शिंदे व त्यांचे बंधू अतुल शिंदे यांनी केले आहे. पाणीटंचाईच्या काळात सलग तीन महिने स्वतःच्या बोअरवेलवरून पंपाद्वारे अहोरात्र पाणीवाटप शिंदे कुटुंबियांकडून केले जाते. गावातील शेतकऱ्यांचे गाई व म्हैशीच्या दुधाला चांगला भाव मिळावा म्हणून दूध डेअरीची स्थापना करून गावातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यातदेखील त्यांना यश मिळाले आहे. 

गावात सुमारे 200 ते 250 लिटर दुधाचे संकलन केले जाते. नुकतेच कामगार कल्याण मंडळाकडून उपलब्ध झालेल्या साहित्याचे वाटप गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.  
 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rajapur Kodavali new dam seven times water storage
Mukhyamantri Vayoshri Yojana
Sindhudurg Ganesh Visarjan
Vengurla Gold Jewellery Theft
Marathi News Esakal
www.esakal.com