कोकणात घरात सापडली दहा किलो वजनाची घोरपड

प्रमोद हर्डीकर
Sunday, 18 October 2020

हातीव येथे घरात शिरली घोरपड,राजा गायकवाड,संतोष मुंडेकर यांनी तीला पकडले

साडवली (रत्नागिरी) : शनिवारी राञी हातीव येथील साटविलकर यांच्या घरात मोठी घोरपड शिरली.यामुळे घरातील सगळे घाबरुन गेले.यावेळी साटविलकर यांनी देवरुख येथील राजु काकडे हेल्प अॅकॅडमीला ही बाब सांगितली त्वरीत अॅकॅडमीचे सदस्य राजा गायकवाड व संतोष मुंडेकर यांनी हातीवला जावून ती घोरपड लिलया पकडली व साटविलकरांच्या घरातील संकट दुर केले.ती घोरपड देवरुखला आणण्यात आली.या घटनेची खबर वनविभागाला देण्यात आली.तात्काळ परिमंडल वनअधिकारी सुरेश उपरे यांनी याची दखल घेतली व घोरपडीची पाहणी केली.यावेळी अॅकॅडमीचे अध्यक्ष गणेश जंगम,प्रवीण पारकर उपस्थित होते.

घोरपड चांगल्या स्थितीत असल्याने तीला अधिवासात सोडुन देण्यात आले.सुमारे दहा किलो वजनाची ती घोरपड होती असे उपरे यांनी सांगितले.संकटात आहात ,हाक मारा,आम्ही सज्ज आहोत हे ब्रीदवाक्य घेवुन गेली ११ वर्ष राजु काकडे हेल्प अॅकॅडमी जिल्ह्यात काम पहात आहे.शंभर युवकांची टिम व २५ महिलांची टिम आपतकालीन व्यवस्थेत सज्ज असते.देवरुख नगरपंचायत,पोलीस स्थानक यांच्याही हाकेला या टिम धावुन जात असतात व संकट दुर करत असतात.शासनाकडुन अनेक पुरस्कार मिळवलेली ही अॅकॅडमी अनेकवेळा अनेकांसाठी देवदुत ठरलेली आहे.घोरपड पकडणार्‍या राजा गायकवाड व संतोष मुंडेकर यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bengal monitor 10 kg was found in a house in Kokan