"11 रुपये' साठी 'यांना' पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

सचिन सावंत यांनी चित्रीकरण, शुभम वाडकर यांनी प्रकाश योजना, किशोर कनोजिया व मानसी पाथरे यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. मिलींद गोवेकर यांनी या लघुपटाला संगीत व ऋषिकेश जोशी यांनी या संकलन केलेले आहे.

रत्नागिरी - विहान प्रॉडक्‍शन्स यांच्या "11 रूपये'साठी ऍड. संकेत घाग यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ल्ड फिल्म कार्निवल सिंगापूर 2020 सीजन- 5 मध्ये रत्नागिरीमध्ये चित्रित "11 रुपये' या लघुपटासाठी श्री. घाग यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार मिळाला. 

कोणत्याही लांबीच्या आणि सर्व प्रकारच्या फिल्म्सच्या दिग्दर्शकांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून संकेत घाग यांची निवड झाली. येथील कलाकार प्रदीप शिवगण आणि परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थिनी कशिश सनगरे हिची या लघुपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. मानसी पाथरे, श्रेया पांचाळ व प्रशांत महाकाळ यांनीही या लघुपटात महत्वपूर्ण भूमिका केलेल्या आहेत. संकेत घाग यांनी "11 रूपये'ची कथा लिहिलेली असून या लघुपटाचे दिग्दर्शनही केले आहे. 

सचिन सावंत यांनी चित्रीकरण, शुभम वाडकर यांनी प्रकाश योजना, किशोर कनोजिया व मानसी पाथरे यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. मिलींद गोवेकर यांनी या लघुपटाला संगीत व ऋषिकेश जोशी यांनी या संकलन केलेले आहे. रमेश कीर कला अकादमीचे विद्यार्थी दिप्ती वहाळकर व सहकाऱ्यांनी कला दिग्दर्शन सांभाळले. या लघुपटाचे सर्व चित्रीकरण रत्नागिरीमध्ये झाले असून या लघु चित्रपटाला आजपर्यंत देश-विदेशातील एकूण 10 पुरस्कार मिळालेले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best Director Award To Sanket Ghag For 11 Rupee Short Film