पडळकरांचे वक्तव्य सत्तेच्या माजातून ;  आमदार भास्कर जाधव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जून 2020

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या पक्ष नेतृत्वालाही सुनावले.

गुहागर  : 10 दिवसांचा आमदार 60 वर्षांची संसदीय कारकीर्द असणाऱ्या नेत्याबद्दल बोलतो. सत्तेचा माज किती असावा त्याचे आमदार गोपीचंद पडळकर हे उत्तम उदाहरण आहे. हे केवळ निषेधार्ह नाही तर चुकीचे आहे. अशावेळी पक्ष नेतृत्त्वाला आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. जनतेला उत्तर द्यावे लागेल, अशा शब्दात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या पक्ष नेतृत्वालाही सुनावले.

गुहागरमध्ये सरपंच संघटनेच्या वतीने आयोजित आढावा बैठकीला आमदार भास्कर जाधव आले होते. त्या वेळी पडळकर यांच्या विधानावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता जाधव म्हणाले, 2014 साली केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आले. तेव्हापासून भाजपच्या सर्वच नेत्यांची बेताल वक्तव्ये सुरू आहेत. भाजपची ही जुनी पद्धत आहे. ज्याची योग्यता नाही, अशा व्यक्तीला विरोधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल बोलायला लावायचे. नंतर वरिष्ठांनी म्हणायचे ते त्यांचे व्यक्तिगत मत असेल. आमचे, पक्षाचे मत नाही. परंतु एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीबद्दल जेव्हा आपल्याच पक्षातला एखादा माणूस काही बोलतो तेव्हा पक्ष नेतृत्त्वाला आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. जनतेला उत्तर द्यावे लागेल. पवार साहेबांचे संसदीय कार्यमंडळातील आयुष्य 60 वर्षांचे आहे. गोपीचंद पडळकर आमदार झाल्याला जेमतेम 10 दिवस झाले आहेत. त्या माणसाने पवार यांच्याबद्दल वक्तव्य करणे हे चुकीचे नाही. भाजपाच्या पक्ष नेतृत्वाने याची जबाबदारी घेतलीच पाहिजे.

हे पण वाचा - कोकणातल्या 8 समुद्र किनार्‍यांवर उभारली जाणार 'हा' प्रकल्प... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhaskar jadhav criticism of gopichand padalkar