अजितदादांच्या गाडीचं शिवसेनेच्या भास्कर जाधवांकडून सारथ्य अन् राजकीय वर्तुळात एकच चर्चा...

Bhaskar Jadhav Drives car for Ajit Pawar in chiplun
Bhaskar Jadhav Drives car for Ajit Pawar in chiplun
Updated on: 

रत्नागिरी - राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत गेल्यानंतरही आमदार भास्कर जाधव यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मैत्रीची गाठ कायम दिसत आहेत. आज रत्नागिरीत आलेल्या अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य करण्याची संधी भास्कर जाधवांनी सोडली नाही.त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यासाठी अजित पवार चिपळूणमध्ये आले होते. यावेळी भास्कर जाधव आपल्या जुन्या सहकाऱ्यांना घेऊन चिपळूणमधील निवासस्थानी गेले. अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री दत्ता भरणे हे जाधवांच्या घरी भोजनासाठी आले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जंगी स्वागत

चिपळूणमधील हेलिपॅडपासून घरापर्यंत स्वतः भास्कर जाधव यांनी गाडी चालवली. शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.जाधवांच्या सारथ्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.

भास्कर जाधवांचा शिवसेनेवरील रुसवा...

गणपतीपुळ्यातील 102 कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 17 फेब्रुवारीला करण्यात आले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या सत्कारानंतर फोटो काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वांना सोबत येण्याची विनंती केली. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी भास्कर जाधवांना सगळ्यांसोबत येण्याची विनंती केली. मात्र तेव्हा त्यांनी हात झटकत नकार दर्शवला. तसेच त्यांना या कार्यक्रमासाठी नारळ वाढवण्याची विनंती करण्यास सांगितल्यावरही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नव्हता.जाधवांच्या या नाराजीची चर्चा झाली होती.नंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजुत काढली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com