भास्कर जाधवांनी सांगितले गडकिल्ल्यांचे महत्त्व 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

भास्कर जाधव यांनी भाषणातून गडकिल्ल्यांचे महत्त्व तसेच पाग विभागाला असलेला ऐतिहासिक वारसा याची आठवण करून दिली. 

चिपळूण - शिवसेना व युवासेना पाग विभागातर्फे दिवाळीनिमित्त गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते झाला. भास्कर जाधव यांनी भाषणातून गडकिल्ल्यांचे महत्त्व तसेच पाग विभागाला असलेला ऐतिहासिक वारसा याची आठवण करून दिली. 

नगरसेविका सई चव्हाण, उपशहरप्रमुख सुयोग्य चव्हाण, माजी उपशहरप्रमुख राजेश सुतार याप्रसंगी उपस्थित होते. ही गडकिल्ले स्पर्धा आयोजित केल्याबद्दल शिवसेना व युवासेना विभाग यांचे जाधव यांनी विशेष अभिनंदन केले. या स्पर्धेमध्ये ग्रीन कॉ. परांजपे स्कीम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक पाग उघडा मारुती मंडळाने पटकावला. त्यांना चषक व रोख रक्कम देण्यात आली. तृतीय क्रमांक श्रीकृष्ण युवक मंडळ यांनी पटकावला. त्यांनाही रोख रक्कम व चषक देण्यात आले तसेच पाग जोशी आळी व पागनाका मारुती मंदिर मंडळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. 

हे पण वाचा - 104 जोडप्यांनी घेतली स्वखर्चातून सप्तपदी

 या स्पर्धेमध्ये पाग विभागातील 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. परीक्षण दिलीप आंब्रे, योगेश बांडागळे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, विभागप्रमुख संजय भुवड, उपविभागप्रमुख महेंद्र कांबळी, नयन चव्हाण, आदेश किंजळकर, सोहम चव्हाण, सुरेंद्र माने, शार्दुल चव्हाण, सुमित चव्हाण, अमेय चितळे, सार्थक कदम, अभिजित शिंदे, दीपेश किंजळकर, कल्पेश कांबळी, अनिकेत किंजळकर, श्रवण चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. 

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhaskar Jadhav explained the importance of forts