पोटासाठी दारू विकली तर काय झाले ? आमदार जाधवांचे वादग्रस्त वक्तव्य

मुझफ्फर खान
Tuesday, 10 November 2020

केवळ चोरी आणि मुलींची छेडछाड या विषयासाठी मला फोन करू नका. अशी तंबीही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.

चिपळूण : पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झाले. पोलिस हप्ते घेत नाहीत का ? असे वक्तव्य गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी काढले. केवळ चोरी आणि मुलींची छेडछाड या विषयासाठी मला फोन करू नका. अशी तंबीही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. गुहागर येथे आयोजित केलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले. 

हेही वाचा - आता घड्याळाची टिकटिक होणार वेगाने -

सोशल मिडीयावर ते चांगलेच व्हायरल झाले असून राजकीय वर्तुळातही त्याची जोरदार चर्चा आहे. आमदार जाधव महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ आणि अनुभवी आमदार आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर त्यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाचे मेळावे घेण्यास सुरवात केली आहे. चिपळूण, दापोली, खेड, मंडणगडसह त्यांनी गुहागरमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. उत्तर रत्नागिरीत युवा सेनेच्या मेळाव्यात त्यांनी भाजपवर टिका केली. 

युती असूनही गुहागरमध्ये भाजपने त्यांना कसा दगा दिला त्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली. तसेच अवैधरित्या होणार्‍या दारू विक्रीचे समर्थनच केले. लॉकडाउनच्या काळात दारूविक्री करणार्‍या शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्याचा संदर्भात देत आमदार जाधव म्हणाले, पोटापाण्यासाठी कुणी दारू विकली तर काय झाले.

हेही वाचा - दोन्ही काँग्रेसला सत्ताबदलाचे वेध ; भाजपमधून कोण करणार बंडखोरी ? -

पोलिस हप्ते घेत नाहीत का ? चोरी आणि मुलींची छेडछाड या दोन गोष्टींसाठी मला कोणी फोन करू नका. बाकी रात्री - अपरात्री कधीही कोणत्याही कामासाठी मला फोन करा मी धावत येईन. अवैधरित्या होणार्‍या दारू विक्रीचे त्यांनी एका प्रकारे समर्थनच केले. त्यामुळे जाधवांच्या या वादग्रस्त वक्तव्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhaskar jadhav statement in guhagar its controversial in ratnagiri