उपनगराध्यक्ष भोजनेंविरोधात अविश्‍वास मंजूर ; चिपळूणात १४४ वर्षांत पहिलीच घटना

bhojane in chihplun first time mistrust against in chaiplun ratnagiri
bhojane in chihplun first time mistrust against in chaiplun ratnagiri
Updated on

चिपळूण (रत्नागिरी) : उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्यावर महाविकास आघाडीने आणलेला अविश्‍वास ठराव विशेष सभेत मंजूर करण्यात आला. अविश्‍वास ठराव मांडता येईल का, यावर नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर ठराव मांडण्याची परवानगी दिली.

चिपळूण पालिकेच्या १४४ वर्षांच्या इतिहासात उपनगराध्यक्षांविरोधात अविश्‍वास ठराव संमत होण्याची ही पहिलीच घटना. पालिकेत महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर विषय समित्यांवर वर्चस्व मिळवले. त्यानंतर भाजपकडून उपनगराध्यक्षपद काढून घेण्यासाठी मागील तीन महिने महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू होते. 

काहींनी भोजनेंना राजीनामा देण्याची सूचनाही केली होती. मात्र, भोजने हे कायद्याचे माहितगार असल्यामुळे ते राजीनामा देणार नाहीत. कायद्याच्या चौकटीत उपनगराध्यक्षपद वाचवण्यासाठी प्रयत्न करतील, याची जाणीव सर्वांना असल्यामुळे महाविकास आघाडीने त्यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला. 

नगराध्यक्षांनी आज बोलावलेल्या सभेला भोजने वगळता सर्व सदस्य उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या मागणीचे वाचन झाले. त्यावर विजय चितळे यांनी आक्षेप घेतला. भोजने यांना पदावरून हटवण्याचे नेमके कारण मागणी पत्रात नाही, त्यामुळे आजची सभा रद्द करावी. भोजने विरोधात कारण देत त्यानंतर सभा घ्या, अशी मागणी केली. 

नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले. उपनगराध्यक्षांवर अविश्‍वास ठराव दाखल करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या सभेत ठराव दाखल झाला नाही किंवा बहुमताच्या आधारे फेटाळण्यात आला, तर पुन्हा अविश्‍वास ठराव घेता येत नाही, अशी तरतूद असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. नगराध्यक्षांचे समाधान न झाल्याने त्यांनी कायद्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला.

वरिष्ठांकडून मार्गदर्शन घ्या, अशी सूचनाही केली. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी मी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले तरी निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे, असे स्पष्ट केल्यानंतर नगराध्यक्षांनी भोजने यांच्या विरोधात ठराव मांडण्याची परवानगी दिली. अविनाश केळस्कर यांनी ठराव मांडला. ठरावाच्या बाजूने २२ जणांनी मतदान केले. 

संंपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Heavy Rain, Dense Forest, Viral Rescue: Six Goa Trekkers Brought to Safety
Vat Purnima woman dies after worship
Marathi News Esakal
www.esakal.com