

Financial Relief for Cattle Rearers: State Announces 4% Interest Concession
sakal
-अमित गवळे
पाली: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने पशुसंवर्धन क्षेत्राला मोठा बुस्टर डोस दिला आहे. पशुपालन व्यवसायाला 'कृषी समकक्ष दर्जा' मिळाल्यानंतर आता किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारक पशुपालकांना त्यांनी घेतलेल्या अल्पमुदतीकर्जाच्या (खेळत्या भांडवलाच्या) व्याजदरात ४ टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पशुसंवर्धन विभागाने ११ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे.