esakal | मंडणगड तालुक्यात चक्रीवादळाच्या कटू आठवणी पुसून उभारी 
sakal

बोलून बातमी शोधा

Bitter memories of cyclone in Mandangad taluka recovered by villages and gets development

कोरोनात रोजगार बुडाला. मुंबईकर नोकरी सोडून गावी आला. आर्थिक उत्पन्न मिळण्याचे मार्ग बंद झाले. अशा कठीण परिस्थितीला सामोरे जात असतानाच निसर्ग कोप झाला. चक्रीवादळात होत्याचे नव्हते झाले.

मंडणगड तालुक्यात चक्रीवादळाच्या कटू आठवणी पुसून उभारी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मंडणगड ( रत्नागिरी ) - कोरोना लॉकडाउन दरम्यान तीन जून रोजी घोंगावलेल्या निसर्ग चक्रीवादळात मंडणगड तालुका उद्‌ध्वस्त होत विस्कटून गेला. कोट्यवधींची हानी होत प्रगतीच्या वाटचालीत पुन्हा चाळीस वर्षे मागे गेला; मात्र तालुकावासीय या परिस्थितीला सामोरे जाताना 2021 मध्ये पुन्हा उभारी घेण्यास सज्ज होत आहेत. 2020 च्या कटू आठवणींना पुसून नवंवर्षाचे स्वागताला सामोरे जाताना दिसत आहेत. 

कोरोनात रोजगार बुडाला. मुंबईकर नोकरी सोडून गावी आला. आर्थिक उत्पन्न मिळण्याचे मार्ग बंद झाले. अशा कठीण परिस्थितीला सामोरे जात असतानाच निसर्ग कोप झाला. चक्रीवादळात होत्याचे नव्हते झाले. डोक्‍यावरचे छतच उडून गेले. संसार उघड्यावर पडला; मात्र तरीही मंडणगडवासीय खचला नाही. शासन, प्रशासन एकमेकांच्या सहकार्याने तो उभारी घेऊ लागला. शासनाने आर्थिक मदतीचा हात दिला तर प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केली.

दरम्यान, एकमेकांना मदत करत सामुदायिक श्रमदानातून उद्‌ध्वस्त गावे उभी केली. वादळात फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. आर्थिक उत्पन्नाचा मार्ग खुंटला. आता हळूहळू बागाही मोकळ्या झाल्या असून आशेची पालवी धरू लागली आहे. वादळात मोडलेल्या, वाकलेल्या आंबा, काजूच्या फांद्यांना मोहर दिसू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा आशा दिसू लागली आहे. आलेल्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात तालुकवासीय नव्या वर्षात आपल्या जिद्द, मेहनतीवर तालुका समृद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या दैनंदिन जीवनात मग्न होत आहे. 

तालुक्‍यातील नुकसान - सुमारे 59 कोटी 
घरं, गोठे, दुकान े- एकूण 16 हजार 676 कुटुंब 
फळबागा - 783.0611 हेक्‍टर, शेतकरी- 3210 
मदतनिधी वाटप - सुमारे 55 कोटीपर्यंत 


2020 मध्ये कोरोना लॉकडाउन, निसर्ग चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा तडाखा यातून तालुकावासीय सावरत मार्गक्रमण करीत आहेत. आपत्काळात शासन, प्रशासनाची भूमिका महत्वपूर्ण ठरणारी असून नागरिकांनीही आपली जबाबदारी स्वीकारली आहे. 
- रघुनाथ पोस्टुरे 
 

loading image