रत्नागिरीत परिवर्तनाची गरज: विकासाचा रोडमॅप माझ्याकडेच; बाळ माने

बाळ माने
बाळ मानेsakal
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरीच्या (Ratnagiri) विकासाची झालेली दुर्दशा आपण पाहत आहात, रस्त्यांवरील खड्ड्यांचा उपद्रव सहन करीत आहात. रखडलेल्या पाणी योजनेमुळे हैराण झाला आहात. माझ्यासमोर रत्नागिरीच्या विकासाचा एक रोडमॅप आहे. चांगली उद्याने, चांगले रस्ते, पाण्याची उत्तम सुविधा आणि सर्व आवश्यक सुविधा रत्नागिरीकरांना मिळाव्यात असा हा रोडमॅप आहे. येथे इंटरनेट ब्रॉडबँड सेवा असेल. इथला विमानतळ विकसित झालेला असेल. रत्नागिरी शहर एक स्मार्ट सिटी बनविण्याचा माझा संकल्प आहे. त्यासाठी रत्नागिरीत आता परिवर्तनाची गरज आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने (Bal Mane) यांनी केले.

पत्रकारांशी बोलताना बाळ माने म्हणाले, आज रत्नागिरी शहराचा विकास पूर्णतः ठप्प आहे. रस्ते जागोजागी खड्डेमय झालेले आहेत. पिण्याच्या पाणी पुरवठ्याची अवस्था गंभीर आहे. स्वच्छता व्यवस्था ही पूर्णतः कोलमडलेली आहे. स्वच्छतेची व्यवस्था ही पूर्णतः हा कोलमडलेली आहे. 2016 साली रत्नागिरी पालिकेत भाजपची सत्ता असताना, भाजपचे नगराध्यक्ष असताना मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रत्नागिरीच्या शहर नळ पाणी योजनेसाठी ६४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. परंतु अद्यापही पाणी योजना पूर्ण झालेली नाही. रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे.

ड्रेनेज सिस्टिम झालेली नाही. सध्याची स्थिती अत्यंत दयनीय अशी आहे. प्रत्येक मूलभूत गोष्ट येथील जनतेला, नागरिकांना याचकासारखी मागावी लागते आहे, हे या रत्नागिरीतील शहरवासीयांचे दुर्दैव आहे. येथील राजकीय नेतृत्वाच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. लोकांना भूलथापा मारणे, फसवणूक करणे हेच उद्योग येथे सुरू आहेत आणि त्यामुळे रत्नागिरी शहराच्या विकासाला खीळ बसलेली आहे.

बाळ माने
भाजपला दे धक्का: राजन साळवींनी बांधले चव्हाणांच्या हातात शिवबंधन

विधानसभा नेतृत्व बदलावे

रत्नागिरीचा संपूर्ण विकास करायचा आहे. त्यामुळे रत्नागिरीची नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व क्षेत्रात आपल्याला परिवर्तन घडवून आणायचे आहे आणि त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य लागणार आहे. रत्नागिरी विधानसभा आणि लोकसभा जागेवरही परिवर्तन घडवून आणायचे आहे. या रत्नागिरी शहराने वेळोवेळी माझ्यावर प्रेम केलं, मला आमदार बनवलं. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षातील स्थिती आपण सर्वांनीच अनुभवली आहे. त्यामुळे रत्नागिरीत आता परिवर्तनाची गरज आहे आणि त्यासाठी समर्थ पर्याय भाजपच्या रुपाने आपल्या समोर आहे. भाजपला आपण साथ द्यावी आणि परिवर्तन घडवून आणावे, असे माझे आपणास आवाहन आहे. एक सुजलाम सुफलाम आणि विकसित रत्नागिरी करण्याचे स्वप्न आमच्यासमोर आहे. मी पाण्यासाठी या शहरासाठी शासनाकडून पैसे आणले. अजूनही काही विकासकामांना पैसे आणता आले असते, परंतु त्यानंतर सत्तापरिवर्तन झाल्याने हे काम घडू शकले नाही, असे माने यांनी केले.

भाजप एक समर्थ पर्याय

माझी रत्नागिरीकरांना कळकळीची विनंती आहे की, भविष्यातील आपला जो नगरसेवक निवडावयाचा आहे तो विकासकाम करणारा असावा. आपल्या विश्वासातला असावा आणि म्हणूनच कोणाला नगरसेवक बनवावे याबाबत योग्य त्या सूचना नागरिकांकडून आल्यास भारतीय जनता पार्टीकडून त्याचे स्वागतच केले जाईल. रत्नागिरीत परिवर्तन घडवून आणायचं आहे आणि एक समर्थ पर्याय म्हणून भाजप त्यासाठी आपल्यासमोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

₹1 crore houseboat lying abandoned
Wildlife Conservationist Dr. Prasad Dabholkar Named Honorary Wildlife Warden for Raigad District
Uday Samant Operation Tiger latest news
Goa Fort Harnai bastion collapse
Marathi News Esakal
www.esakal.com