आता  'यांच्या' मुलांची लग्नेही आमच्याच पैशांनी होणार ; राणेंनी शिवसेनेचा काढला चिमटा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयातील बेकायदा बांधकामावर पालिकेने एक दिवसाची नोटीस देऊन कारवाई केली होती.

सावंतवाडी : मुंबईचे रहिवाशी कर कशासाठी भरतात?  पेंग्विन साठी की  कंगनाच्या खटल्यात वकिलांच खर्च भागविण्यासाठी असा सवाल  भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे.अभिनेत्री कंगना राणावत हिने महापालिके विरोधात दाखल केलेल्या खटल्यातील वकिलाच्या शुल्कापोटी पालिका प्रशासनाने आतापर्यंत ८२ लाख ५० हजार रुपये खर्च केले आहेत. त्यावर भाजप आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर ट्वीटरच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे.

'यांच्या' मुलांची लग्नेही आमच्याच पैशांनी होणार, असे ट्वीट करत राणेंनी शिवसेनला चिमटा काढला आहे.माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळवण्यात आली आहे. कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयातील बेकायदा बांधकामावर पालिकेने एक दिवसाची नोटीस देऊन कारवाई केली होती. ती सुरू असतानाच कंगनाने न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबतचा खटला सध्या उच्च न्यायालयात सुरू आहे.

 

खटल्यात बाजू मांडण्यासाठी महापालिकेने ज्येष्ठ विधिज्ञ अस्पी चिनॉय यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या शुल्कापोटी पालिकेने आतापर्यंत ८२ लाख ५० हजार रुपये खर्च केले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत त्याबाबत माहिती मिळवली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी काल नितेश राणे व नारायण राणेंवर टीका केली. नाईक मातोश्रीच्या अंगणात तुळशी वृंदावनच आहे. मात्र, गांजाची शेती कुणाच्या अंगणात पिकते याची विचारणा नीतेश राणेंनी आपल्या मोठ्या भावाकडे करावी. त्वरित त्याचा उलगडा होईल, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला.

 संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp mla nitesh rane tweet criticize shivsena