Raigad News : सुंदरराव मोरे महाविद्यालयासाठी मदत करणार; आमदार प्रवीण दरेकर

महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात आमदार प्रवीण दरेकर मुख्य अतिथी म्‍हणून उपस्‍थित होते.
bjp mla pravin darekar help sundarrao more college for development student career building
bjp mla pravin darekar help sundarrao more college for development student career buildingSakal

पोलादपूर : महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास मंत्री कै. प्रभाकर मोरे यांनी स्थापन केलेल्या सुंदरराव मोरे महाविद्यालयाने २५ वर्षांच्या कालावधीत केलेली प्रगती पाहून नक्कीच समाधान वाटते. महाविद्यालयाच्या भविष्यकालीन विकासासाठी सढळ हाताने सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केले.

महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात आमदार प्रवीण दरेकर मुख्य अतिथी म्‍हणून उपस्‍थित होते. या वेळी दरेकर पुढे म्‍हणाले की, कोकण विभागामध्ये शिक्षण व सहकारी संस्थांची उभारणी आणि संस्थात्मक विकास यांचा अभाव प्रकर्षाने दिसून येतो.

यामुळेच कोकण विभाग अनेक बाबतीत मागे असल्याचे मत व्यक्त करून रायगड जिल्ह्यातील लोकांनी विविध प्रकारचे लघुउद्योग करण्यासाठी पुढे यावे. आपण मुंबई जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांना सर्वतोपरी मदत करू,

असे सांगून विद्यार्थ्यांनी देखील चाकोरीबद्ध शिक्षण घेण्यापेक्षा उच्च ध्येय व सातत्यपूर्ण परिश्रमाच्या आधारावर स्वतःबरोबरच स्वतःच्या गावचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनदेखील या वेळी दरेकर यांनी केले.

यावेळी आमदार भरत गोगावले, माजी राजिप सदस्य अमित प्रभाकर मोरे, माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. संतोष काळे, उपाध्यक्ष ॲड. विनोद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन आणि मान्यवरांच्या स्वागतानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य व मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. दीपक रावेरकर यांनी महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा प्रवास आपल्या अहवाल वाचनातून सादर केला.

आमदार गोगावलेंकडून कौतुक

आमदार भरत गोगावले यांनी रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये महाविद्यालयाने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एम. एससी (ऑरगॅनिक केमिस्ट्री) हा कोर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीमध्ये बहुउद्देशीय सभागृह, आधुनिक संगणक प्रयोगशाळा उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करून महाविद्यालयाला भरघोस इमारत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com