Sindhudurga : रस्ता आंदोलनाची नौटंकी भाजपने बंद करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

रस्ता आंदोलनाची नौटंकी भाजपने बंद करावी

मालवण : तालुक्यातील दुरवस्था झालेल्या विविध रस्त्यांच्या कामाला आता सुरवात झाली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या प्रश्नी आंदोलन करण्याची नौटंकी भाजपने बंद करावी. दर्जेदार रस्ते बनविण्यासाठी ठाकरे सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे भाजपने जनतेची दिशाभूल करू नये, अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे.

तालुक्यातील खड्डेमय रस्ते दर्जेदार बनविण्याची जबाबदारी आपली असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले होते. दसऱ्यानंतर या रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरवात केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अवकाळी पावसामुळे ही कामे सुरू होण्यास अडचणी होत होत्या. मात्र आता कुडाळ मालवण, ओझर कांदळगाव येथील रस्त्यांच्या कामांना सुरवात झाली आहे. देवबाग सह अन्य रस्त्यांच्या कामांनाही लवकरच सुरवात केली जाणार आहे. त्यामुळे या रस्त्यांप्रश्नी आंदोलन करण्याची नौटंकी भाजपने थांबवावी. जनतेची दिशाभूल करू नये. तालुक्यातील रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी ठाकरे सरकारच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत असेही श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top