esakal | 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपाउंडरचे ऐकू नये'
sakal

बोलून बातमी शोधा

bjp state secretary and former mla pramod jathar press conference on refinery

कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा रूळावर आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपाउंडरचे ऐकू नये'

sakal_logo
By
संदेश पटवर्धन

राजापूर  - कोरोनासह विविध कारणांमुळे कोकणासह राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा रूळावर आणण्यासाठी रिफायनरीसारख्या प्रकल्पाची आवश्यकता आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊतांसारख्या कंपाउंडरचे न ऐकता डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय केळकर यांसारख्या ज्येष्ठ डॉक्टरांचे ऐकून मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी उभारावी, असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले. 

रिफायनरीसाठी मुख्यमंत्री ठाकरे, पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्यासह शिवसेनेचे लोकसभेतील अनेक खासदारही अनुकूल असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी या वेळी केला.

शहरातील श्री मंगल कार्यालय येथे आज जठार यांची पत्रकार परिषद पार पडली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, मोहन घुमे, विवेक गुरव, सूरज पेडणेकर, श्रृती ताम्हणकर, सिंधुदुर्गचे बाळा खडपे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.  

या वेळी जठार म्हणाले, कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा रूळावर आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यासाठी रिफायनरीसारख्या प्रकल्पाला प्राधान्य देण्याची मागणी डॉ. माशेलकर, डॉ. केळकर यांसारख्या तज्ञांनी केली आहे. त्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्राधान्याने विचार करून विकासाला चालना देणारा रिफायनरी प्रकल्प उभारावा. मुख्यमंत्र्यांनी खासदार राऊतांसारख्या कंपाउंडरांचे ऐकल्यास कोकणाला भविष्यात वाईट दिवस येतील. प्रकल्प समर्थनाचा वणवा पेटत आहे. त्या अनुषंगाने लोकांचे म्हणणे ऐकले नाही तर, सरकारही जागेवर राहील की नाही याबाबत शंका राहील. 

हे पण वाचा - गजरा मोगर्‍याचा आणि अबोलीचा...

रिफायनरी प्रकल्पातील नोकर्‍यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे. स्थानिक स्तरावर रोजगाराभिमुख कौशल्य विकसित करणारे प्रशिक्षण सुरू करण्याची मागणी रिफायनरीची उभारणी करणार्‍या कंपनीकडे केल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी दिली. यामध्ये राजापूर, देवगड तालुक्यातील लोकांना प्राधान्य मिळावे. यामध्ये पहिल्या टप्प्यात दहा हजार लोकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी इच्छुकांची नावनोंदणी करण्याचे अर्ज वितरण करण्याचा कार्यक्रम भाजपातर्फे राबविला जात आहे. त्याचा आज आरंभ झाला.
  

संपादन-धनाजी सुर्वे