Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अधिकारी प्रचारकामात असल्याची भाजप तालुकाध्यक्षांची तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

वैभववाडी - जिल्हा बॅंकेच्या हेत येथील शाखेत गेलेले तीन अधिकारी निवडणूक प्रचाराचे काम करीत होते. त्यांच्या गाडीत कार्यकर्त्यांची नावे असलेली यादी सापडली आहे, असा तक्रार अर्ज भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे यांनी आज पोलिसांत दिला आहे. पोलिसांनी चौकशी केली असता "बॅंकेच्या कार्यालयीन कामांसाठी हेत शाखेत आलो असल्याचे अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगीतले. 

जिल्हा बॅंकेचे सरव्यवस्थापक आनंद आकाराम सांवत, विकास अधिकारी सुबोध कुडतकर, चालक यशवंत सांवत हे हेत येथील बॅंकेच्या शाखेत गेले होते. तेथून बाहेर पडत असताना भाजपचे कार्यकर्ते तेथे पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यानतंर त्यांच्याकडे भुईबावडा विभागातील काही लोकांची नावे असल्याची यादी आढळुन आली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी हे अधिकारी निवडणूक प्रचार करीत असल्याचा आरोप करत त्यांना भुईबावडा पोलिस दूरक्षेत्र येथे आणले. तेथे भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे यांनी तीनही अधिकारी प्रचार करीत असल्याचा तक्रार अर्ज दिला. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना वैभववाडी पोलिस स्थानकात आणण्यात आले. 

दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी तक्रारदाराच्या अर्जानुसार चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीनतंर हे सर्व प्रकरण तहसिलदारांकडे दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण 
पोलिसांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ""बॅंकेच्या कार्यालयीन कामांसाठी वैभववाडी तालुक्‍यात आलो होतो. येथील मोहन बावडेकर यांनी बॅंकेकडे तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीचे निरसन करून हेत येथील शाखेत गेलो होतो. बॅंकेचे गाडी कुणीही वापरत असते. आज ही गाडी आम्हा घेवुन आलो. "ती' यादी सामान ठेवण्याच्या जागेत सापडली आहे. त्याचा काहीही संबध नाही, असे अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Taluka chief complains that Sindhudurg District Bank officials are in the campaign