esakal | 'ग्रामपंचायतीला कसे लुटले  त्याची सीडीच आपल्याकडेच' 
sakal

बोलून बातमी शोधा

bjp taluka president abhijit gurav criticize for kodavliu sarpanch kokan


अभिजित गुरव ; ग्रामपंचायत निवडणुकीत ती दाखवणार 

'ग्रामपंचायतीला कसे लुटले  त्याची सीडीच आपल्याकडेच' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : ग्रामस्थांच्या मागणीनुसारच कोदवली ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी असा खुलासा करणाऱ्यांपैकी अनेकजणांनी कोदवली ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविलेले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर गैरव्यहार करून ग्रामपंचायतीला लुटलेले आहे. त्याची सीडीच आपल्याकडे असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत ती आपण ती दाखवू, असा पलटवार भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केला आहे. 


ग्रामपंचायतीची चौकशी राजकीय सूडापोटी केल्याचा आरोप भाजप तालुकाध्यक्ष गुरव यांनी केला. त्यावर खुलासा करताना हरिभाऊ गुरव यांनी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीप्रमाणे चौकशी होत असल्याचा खुलासा केला. या खुलाशावर अभिजित म्हणाले, ज्या सोळाजणांनी हा खुलासा केला आहे त्यातील निम्मे माजी सरपंच आहेत. त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. गावातील नळपाणी योजनेच्या कामामध्ये जुने पाइप टाकून नवीन पाइपची बिले काढण्याचा कसा प्रकार घडला, हर्डी-पाथर्डे केळवडे रस्त्याचे खड्डे बुजविण्याच्या कामामध्ये अपहार झाला आहे, कोदवली तरळवाडीच्या विहिरीचे काम अद्यापही अर्धवट स्थितीमध्ये का , कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहतीमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामांना कोण पाठीशी घालत होते, केळवडे गावामध्ये घरकुल योजना मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून कशा प्रकारे पैसे लाटण्यात आले, या साऱ्याची सविस्तर माहिती आपल्याकडे आहे. मला तोंड उघडायला लावू नका नाहीतर संपूर्ण कुुंडलीच मीडियासमोर आणेन, असा इशारा गुरव यांनी दिला आहे. 

हेही वाचा- Photo: मुरूड, कर्दे, लाडघरसह गणपतीपुळे पर्यटकांनी गजबजला


पुरावे आमच्याकडे आहेत 
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनामध्ये कामे झाली, अशी कागदावर दाखवून पैसे काढण्यात आले. त्या वेळी कोदवलीचे ग्रामसेवक असलेले मयेकर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे 5 ते 6 लाख रुपये ग्रामपंचायतीकडे जमा करून ठेवण्यात आले होते. त्या वेळी कोण ग्रामपंचायतीचा कारभार पाहत होते आणि मयेकर यांना कसा फटका बसला त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. एवढेच नव्हे तर त्या ग्रामसेवकाने कालांतराने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश आणल्यानंतर त्यांचे पैसे देताना त्या वेळी पुढाऱ्यांनी किती पैसे घेतले, हे संपूर्ण गावाला माहित आहे. 
 

 संपादन- अर्चना बनगे