गुहागर : तालुक्यातील एका पाणीपुरी सेंटरवरून (Panipuri Center) पालपेणे येथील नामदेव पडवेकर आपल्या नातवांसाठी पाणीपुरीसाठी लागणारा रगडा घेऊन गेले होते. घरी गेल्यानंतर आपल्या नातीला तो रगडा गरम करायला सांगितलं. तिने तो गरम करायला सुरुवात केल्याने आतून किडे, काळ्या रंगाच्या अळ्या वर येऊ लागल्या. तिने ही गोष्ट आजोबांच्या लक्षात आणून दिली.