अनबॉक्सतर्फे आज रत्नागिरीत रक्तदान शिबिर

अनबॉक्सतर्फे आज रत्नागिरीत रक्तदान शिबिर

अनबॉक्सतर्फे आज रत्नागिरीत
रक्तदान शिबिराचे आयोजन

रत्नागिरी, ता. ८ : अनबॉक्स युवर डिझायर या फूड डिलिव्हरी करणाऱ्या अॅपच्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. ९) सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिर (ता. ९) सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत जिल्हा परिषद शेजारील मराठा मंडळ हॉल येथे होणार आहे. या शिबिरासाठी दात्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अनबॉक्सचे संचालक गौरांग आगाशे यांनी केले आहे. रक्तदात्यांना अनबॉक्सकडून आकर्षक गिफ्ट व्हाऊचर देण्यात येणार आहे. अनबॉक्सतर्फे प्लास्टिक कचरासुद्धा दर महिन्याला गोळा केला जातो. चार वर्षांत रत्नागिरीकरांनी अॅपला उदंड प्रतिसाद दिला असून, आगामी काळात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे आगाशे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com