Blue whale: गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या देवमाशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू, ऑपरेशन ब्लू व्हेल अपयशी

अथक प्रयत्नांनंतरही गणपतीपुळे समुद्र किनारी आलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू
Blue whale
Blue whaleEsakal

गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळून आलेल्या ब्लू व्हेल माशाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी शर्थाचे प्रयत्न करून देखील त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ग्रामस्थांसह प्रशासनाकडून या माशाचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं आहे. काल (बुधवारी) रात्री व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्याजवळ ग्रामस्थांना व्हेल माशाचं पिल्लू बेशुद्ध अवस्थेत सापडलं होतं. या पिल्लाची प्रकृती खालावलेली होती. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाकडून या व्हेल माशाला जिवंत ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

काल या पिल्लाला कापडामध्ये गुंडाळून त्याच्यावर दिवसभर पाण्याचा मारा केला जात होता. भरती सुरू झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत या माशाला जेसीबीच्या सहाय्याने समुद्रामध्ये ५ ते ६ किलोमीटर पर्यंत आत सोडण्यात आले होते.

दोन दिवसांपूर्वी हा मासा येथील समुद्र किनाऱ्यावर आल्यानंतर त्याला खोल समुद्रात अशक्तपणामुळे जाता येत नव्हते; मात्र वन विभाग, स्थानिक नागरिक, जिंदल, कोस्टगार्ड, एमटीडीसी, मत्स्य विभाग, जीवरक्षक आणि जिल्हा प्रशासन आदींच्या अथक प्रयत्नामुळे त्याला समुद्रामध्ये सोडण्यात आले होते. (Marathi Tajya Batmya)

Blue whale
Blue Whale : अखेर व्हेल माशाचं पिल्लू सुखरुप समुद्रात परतलं; 'असं' चाललं रेस्क्यू ऑपरेशन

दरम्यान व्हेलला जीवदान देण्यासाठी कपड्यांनी झाकून ठेवून त्यावर सतत पाण्याचा मारा सुरू ठेवण्यात आला. तीन जेसीबी, टग आणि बोटींच्या साह्याने व्हेलला मंगळवारी रात्री खोल समुद्रात सोडण्यात यश आले. दीर्घ श्वास सोडत व्हेलही वेगाने खोल पाण्याच्या दिशेने रवाना झाला आणि 'ऑपरेशन व्हेल' चाळीस तासांनी यशस्वी झालं होतं.

गणपतीपुळे एमटीडीसी रिसॉर्टच्या बाजूला सोमवारी (ता. १३) किनाऱ्यावर व्हेल मासा वाळूत अडकला असल्याची माहिती - मिळाली. त्यानंतर वन विभागाच्या बचावकार्याचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पशुवैद्यकीय अधिकारी काळे तसेच मत्स्य विभागाचे प्राध्यापक पावसे यांनी व्हेलची तपासणी केली असता, मासा अशक्त असल्याने त्याला तत्काळ समुद्रात सोडणे गरजेचे होते.

विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी राजेश्री कीर यांनी स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमार यांच्या बोटीच्या मदतीने भरतीच्या पाण्यात त्याला खेचण्याचा पहिला प्रयत्न केला; परंतु तो पुन्हा पाण्याबाहेर आला. त्याला जेसीबीच्या साह्याने पाण्यात खेचण्याचा प्रयत्न केला; परंतु तो पुन्हा-पुन्हा पाण्याच्या बाहेर येत राहिला. मंगळवारी दोन प्रयत्न यशस्वी झालेले नव्हते. व्हेल अशक्त झाल्यामुळे त्याला औषधांची गरज होती. त्यासाठी पुणे येथील संस्थेला पाचारण करण्यात आले. डॉ. चेतन यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत व्हेलला सलाईन, औषधे मंगळवारी (ता. १४) औषधोपचार करण्यात आले होते.

Blue whale
Sugar Factory : उसाला FRP 500 रुपये द्या, अन्यथा शेतकऱ्यांसोबत..; 'स्वाभिमानी'नंतर रयत संघटनेचा साखर कारखान्यांना स्पष्ट इशारा

बुधवारी मंत्रालयातून सूत्रे हलली

मंत्रालयातून दूरध्वनीवरून संपर्क साधत व्हेल ऑपरेशनची माहिती मागवण्यात आली. त्यानंतर वन विभागाने कोस्टकार्डशी संपर्क साधून त्यांच्या बोटी मागवल्या. त्यांच्या साह्याने भरतीच्या पाण्यात अवजड व्हेलला ढकलण्याचा प्रयत्न केला; परंतु माशाचे वजन सुमारे ४ टन असल्यामुळे कोस्टगार्डच्या बोटीला ओढणे शक्य झाले नाही. पुढे जयगड मच्छीमार, स्थानिक मच्छीमार संघटनेशी संपर्क साधला, परंतु त्यांच्याकडूनही आवश्यक बोटी व इतर साहित्य उपलब्ध झाले नाही.

अखेर वन अधिकारी यांनी जेएसडब्ल्यू कंपनीशी कॅप्टनशी संपर्क साधून टग मागवण्यात आला. माशाच्या रेस्क्यूसाठी ट्रॅवलर व हुक्सची मागवण्यात आले. त्यानंतर जेएसडब्ल्यूचे कॅ. अंकित व एक्सपर्ट टीमच्या मदतीने सायंकाळी ८ वाजता कार्यवाही सुरू केली. रात्री ११-३० वाजता व्हेल माशाला अखेर सुखरूपरित्या समुद्रात सोडण्यात यश आले. नौदलाशी संपर्क साधून हेलिकॉप्टरच्या साह्यानेही प्रयत्न करण्याची तयारी वन विभागाने चालवली होती. मात्र, या पिल्लाचा मृत्यू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com