
रत्नागिरी / पावस : पावसजवळील रनपार खाडीत सुमारे १५ वावांमध्ये होडी उलटून १६ जण बुडाले; परंतु फिनोलेक्स कंपनीची अलफरदिन व पायलट बोट सिल्वर सनवरील बंदोबस्तासाठी असलेले पोलिस आणि एमएसएफच्या जवानांच्या तत्परतेमुळे सर्वांना वाचविण्यात यश आल्याने अनर्थ टळला. या दुर्घटनेमध्ये ‘सरस्वती’ या होडीला जलसमाधी मिळाली असून, पूर्णगड पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, परशुराम जयंती उत्सवानिमित्त गावात काही तरुण आले होते. त्यापैकी काही जणांना समुद्र सफारी करण्याचा मोह टाळता आला नाही. रनपार किनाऱ्यावर असलेली छोटी होडी घेऊन १६ जण रनपार खाडीमध्ये फिरायला गेले. दुपारी ३च्या सुमारास ते पावस खारवीवाडा येथील खाडीत जलपर्यटन करत होते. समुद्र खवळलेला असल्याने व जास्त लोक होडीत असल्याने होडीवरील नियंत्रण सुटले आणि होडीचा तराफा खांबाला लागून ती उलटली. यामुळे होडीतील १६ जण बुडाले. समुद्रात पोहता पोहता अनेकांनी वाचवण्यासाठी आरडाओरड सुरू केली.
दरम्यान, पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सागरी सुरक्षाकवच अभियान सुरू आहे. या माध्यमातून किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात पोलिस गस्त सुरू होती. गस्तीला असलेले सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या होडी उलटल्याचे लक्षात आले. फिनोलेक्स कंपनीची ‘अल फरदिन’ व पायलट बोट ‘सिल्वर सन’वरील कर्मचारी हवालदार मुजावर, एमएसएफचे जवान विजय वाघब्रे, अपूर्व जाधव हे तत्काळ मदतीसाठी धावून गेले. त्यांनी बुडत असलेल्या १६ जणांना बोटीवर घेऊन त्यांचा जीव वाचवला.
...वाचलेले १६ जण
होडी मालकाचे नाव भागेश वडपकर असून, वाचलेल्या १६ जणांची नावे अशी : केतन अवी अडवीलकर, मयूरेश वरवडकर, महेत मंगलदास खडपे, ज्ञानेश्वर नारायण डोरलेकर, आर्यन रत्नाकांत वरवटकर, श्रेयश संतोष वरवटकर, कुणाल महादेव डोर्लेकर, स्वानंद विजय वरवटकर, अथर्व सुरेंद्र नाचणकर, साई प्रसाद वाडेकर, स्मित विनोद बोरकर, गोरंग रमाकांत सुर्वे, ओम गणेश सुर्वे, अथर्व दिनानाथ सुर्वे, रुद्र नीलेश सुर्वे.
१६ तरुण होडी घेऊन रनपार खाडीमध्ये फिरण्यासाठी गेले होते. फिनोलेक्सच्या जहाजांसाठी समुद्रात काही खांब उभे केले आहेत. त्या खांबाला होडीचा तराफा लागून ती उलटली आणि ते सर्व जण बुडाले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बंदोबस्ताला असलेले आमचे पोलिस कर्मचारी आणि फिनोलेक्सच्या बोटीने त्यांना वाचविले. आता ते सुखरूप आहेत.
- धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.