रत्नागिरी : स्थानिक मच्छीमारांवर (Fisherman) कारवाई करताना कोणतीही सहानुभूती दाखवली जात नाही. त्याचवेळी परप्रांतीय नौकांवर कारवाई करताना आखडता हात घेतला जात आहे. ड्रोन, मत्स्य व्यवसाय विभाग, सीमा शुल्क (कस्टम) विभाग या घुसखोरीला का रोखू शकत नाहीत? स्थानिक मच्छीमारांवर मासळी मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. परप्रांतीय नौकांवर कारवाईसाठी आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा राज्य वेस्टकोस्ट पर्ससीन मच्छीमार संघटनेचे (State (Westcoast Percival Fishermen Association) कार्याध्यक्ष नासीर वाघू यांनी दिला.