Police inspecting the site where a man’s tattooed body with a metal bracelet was found in the Vaitarna River.
Police inspecting the site where a man’s tattooed body with a metal bracelet was found in the Vaitarna River.Sakal

Alibag News: वैतरणा नदी पात्रात पुरुषाचे प्रेत आढळल्याने खळबळ; उजव्या हातात धातूचे कडे तर दोन्ही हातावर गोंदण

Shock in Vaitarna as Man’s Dead Body Found in River: वैतरणा नदीपात्रात गतसाली घातपात तसेच हत्या करून मृतदेह फेकुन दिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावर्षी धरण भरल्यानंतर एका अनोळखी 30 ते 40 वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या उजव्या हातात धातूचे कडे असून दोन्ही हातावर गोंदण आहे.
Published on

मोखाडा : मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत, कारेगाव शिवाराच्या बाजूने वैतरणा नदीपात्रात अनोळखी पुरुष जातीचे प्रेत आढळुन आले आहे. मोखाडा पोलिसांनी सदर व्यक्तीचे शव, शवविच्छेदन करण्यासाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असुन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ ऊडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com