
पाली : सुध वनपरिक्षेत्रातील काही जाबाज नागरिकांनी जीवाची बाजी लावून वणवे विझवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. या नागरिकांनी वणवे विझवण्यास वनविभागास सहकार्य करून वन संरक्षण व संवर्धनाचे काम केल्याबद्दल त्यांना सुधागड-पाली वनविभागातर्फे गुरुवारी (ता.1) सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.