यंदा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या कृषी प्रदर्शनाला ब्रेक 

Break To Sindhudurg Zilla Parishad Agricultural Exhibition This Year
Break To Sindhudurg Zilla Parishad Agricultural Exhibition This Year
Updated on

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - कोरोनामुळे जिल्हा परिषद बजेट 50 टक्केवर आले आहे. त्यामुळे सर्वच योजनाना कात्री लागली आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने कृषी, पशु-पक्षी हे राज्यस्तरीय प्रदर्शन यावर्षी घेण्यात येणार होते; मात्र यासाठी सुमारे 36 लाख रुपये खर्च येतो; परंतु निधीला 50 टक्के कात्री लागल्याने 16 लाख रूपयांची तरतूद केलेली आहे. हा निधी कमी पडणार आहे.

त्यामुळे यावर्षी हे प्रदर्शन न घेण्याच्या निर्णय घेतला आहे. हा निधी पशु व कृषी विभागांच्या योजनांकडे वळविण्यात येणार आहे, अशी माहिती आज झालेल्या पशु संवर्धन व दुग्ध विकास समिती सभेत सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी दिली. 

समितीची सभा सभापती म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झाली. यावेळी प्रभारी जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. सुधाकर ठाकुर, सुनील पारकर, स्वरूपा विखाळे, अनुप्रिती खोचरे, दिलीप तळेकर उपस्थित होते. 2018-19 मध्ये हे प्रदर्शन जागा उपलब्ध न झाल्याने हावू शकले नव्हते.

2019-20 मध्ये प्रदर्शनाची तारीख सुद्धा जाहीर केली होती; परंतु कोरोना आल्याने राज्य शासनाने कार्यक्रम बंदी घातली. त्यामुळे हे प्रदर्शन होऊ शकले नाही. यावर्षी नियोजन केले होते; परंतु उपलब्ध तरतूद पुरेशी नसल्याने रद्द करावे लागत आहे. कोरोना कधी संपेल हे सांगता येत नाही. त्यामुळे वाढीव निधी मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत असल्याचे म्हापसेकर यांनी सांगितले. 

पशु दवाखाना मांगवलीत
दोडामार्ग तालुक्‍यातील आखवणे गाव प्रकल्प बाधित झाल्याने येथील पशु दवाखाना मांगवली येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्य शासनाच्या दुभत्या जनावरांना पशुखाद्य पुरविणे या योजनेतील शिल्लक एक लाख 82 हजार रुपये, एकात्मिक कुक्कुट विकास योजनेचे 42 हजार रुपये व अन्य एका योजनेचे असे एकूण तीन योजनांचा शिल्लक निधी यावर्षी त्याच योजनेवर खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाने सुरु केलेल्या पायलाग आजार प्रतिबंध लसिकरण व टॅगिंग या मोहिमेचे काम सुरु असून एकूण एक लाख 60 हजार जनावरांपैकी 60 हजार जनावरांना हे टॅगिंग पूर्ण झाल्याचे डॉ. ठाकुर यानी सांगितले; मात्र टॅगिंग करण्यास पशु पालकांचा विरोध आहे. टॅगिंग केल्यामुळे नंबर मिळतो. या नंबरचा आधार घेवून भविष्यात कोणतीही योजना राबविल्यास त्याचा फायदा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी पशु पालकानी सहकार्य करावे, असे आवाहन केले. 

गोवा सरकारची "मिशन रेडिज' 
गोवा सरकारने आपल्या राज्यातील मोकाट कुत्रे यांच्यासाठी "मिशन रेडिज' ही मोहिम राबविली आहे. राज्यात ही मोहिम पूर्ण झाली आहे; परंतु गोवा राज्याला लागून असलेल्या जिल्ह्यातील तालुक्‍यामधील कुत्रे गोवा हद्दीत प्रवेश करतात. त्यामुळे सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग या तीन तालुक्‍यात ही मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी आवश्‍यक परवानगी देण्यात आली आहे, असे म्हापसेकर यानी सांगितले. यावेळी जिल्ह्यात 25 पशु डॉक्‍टर पदे मंजूर असताना केवळ 10 पदे कार्यरत आहेत, अशीही माहिती दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com