पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाला अनावरण झालेला राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती.
मालवण : शहरातील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Forts) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सद्यस्थितीत पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. चौथऱ्यावर बसविण्यात येणाऱ्या खडकांच्या प्रतिकृतीचे तीन भाग गाझियाबाद येथून आणण्यात आले.