सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएलच्या सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास श्री. राणे यांना मंत्री शिंदे यांनी दिला आहे.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल सेवांमध्ये (BSNL Services) सुधारणा करण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी आग्रही भूमिका घेतल्यानंतर बीएसएनएलची यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनीही बीएसएनएल नेटवर्क सेवा तातडीने सुरळीत करण्यात येत असून चार महिन्यांत मे-जून पर्यंत ४ जी सेवेत अपग्रेडेशन पूर्ण करण्यात येणार आहे. शिवाय सिंधुदुर्गात हायस्पीड इंटरनेट सेवाही अधीक सक्षम करण्याबाबतच्या सूचना दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्या आहेत.