रत्नागिरी कार्यालयाच्या मागील बाजूस बुद्धमूर्ती आहे. त्या जागेत कम्युनिटी सेंटर विकसित करण्याकरिता प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
रत्नागिरी : डीएसपी बंगल्यानजीक थिबा राजाच्या कालावधीतील बुद्धमूर्ती (Buddha Idol) आहे. ती मूर्ती हलवण्याबाबत निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र तेथील बुद्धमूर्ती अन्यत्र हलवू नये, अन्यथा बौद्ध अनुयायांतर्फे (Buddhist Community) उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.