esakal | अर्थसंकल्प २०२० : अर्थसंकल्पात कोकणाला काय मिळाले ? वाचा....
sakal

बोलून बातमी शोधा

the budget for kokan

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला.

अर्थसंकल्प २०२० : अर्थसंकल्पात कोकणाला काय मिळाले ? वाचा....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला. दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली, आमदार निधी दोन कोटी वरुन तीन कोटी करण्यात आला आहे. तसेच विविध योजनासाठी निधींची घोषणा यावेळी करण्यात आली. 

कोकणासाठी काय ? 

  • कोकण सागरी महामार्गास ३ वर्षात स्वरुप देण्यासाठी ३५०० कोटीची तरतुद होणार
  • कोकण विभागात काजू फळ पिकावर प्रक्रिया करण्यार्या उद्योगाला चालना मिळणार


काल अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्याची घोषणा

कोकणचं वैभव राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असून जलदुर्गांचा विकास करुन पर्यटन वाढवू. तसेच येत्या एप्रिलमध्ये कोकणात व्हायरोलॉजी लॅब सुरू करणार आणि चांगली दवाखाने सुरू करणार असल्याची घोषणा काल मुख्यमंत्र्यांनी केली होती. तसेच एक मेपर्यंत चिपी विमानतळ सुरू करणार असून अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत अशी घोषणा त्यांनी केलती.

या सर्व घोषणांवर मात्र विरोधी पक्षाने नाराजी व्यक्त करत या अर्थसंकल्पात सरकारने कोकणाच्या तोंडाला फक्त पानं पुसण्याच काम केलं अशी टिका केली आहे.

loading image