
गावतळे (रत्नागिरी) : रविवार असल्याने संध्याकाळी नेहमीप्रमाणे गावतळे बाजारपेठ ग्राहकांनी फुलली होती. संध्याकाळी सुमारे 6.35च्या सुमारास अचानक असोडंच्या बाजूने 'बाजा' चा आवाज येऊ लागला आणि बाजारपेठेतील सर्वांच्या नजरा रस्त्यावर लागल्या. समोरून डौलदार सजविलेल्या तीन बैलगाड्या गावतळे बाजारपेठेत दाखल झाल्या. सजविलेल्या बैलगाड्या बघताच ही गर्दी उसळली.
या बैलगाड्या कोढें येथील शेतकरी मंगेश पालशेतकर यांनी कोल्हापुरातून आणल्या. पालशेतकर यांना बैल व बैलगाडीची खूप आवड. सुकंदर (खेड) येथील सुप्रसिद्ध भवानीदेवीच्या जत्रेत दरवर्षी ते सजवून बैलगाडी नेतात व सर्वांचे लक्ष आकर्षित करतात. गावतळे येथे बैलगाडी दाखल होताच, एकच गर्दी पाहावयास मिळाली. ही संपूर्ण बैलगाडी एलईडी बल्ब व विद्युत तोरणांनी सजविली होती. ट्रॅक्टरच्या बॅटरीवर सर्व विद्युत रोषणाई केली होती. संपूर्ण बैलगाड्या रंगवलेल्या होत्या.
बैलजोड्यांवर गुलालाची उधळण करण्यात आली होती तसेच गळ्यात घुंगरू व शोभिवंत माळी बैलांच्या शिंगांना रंगविण्यात आले होते. बैलगाडीच्या समोर प्रखर उजेडाचा बल्ब लावला होता. सोबत बाजेवाले व फटाक्यांची आतषबाजी व सोबत 20 ते 25 लोकांचा फौजफाटा यामुळे माहोल एकदम जुन्या काळात घेऊन जाणारा झाला होता.
बैलगाडीवान भगवा फेटा व आकर्षक पेहराव करून आले होते. यामुळे प्रत्येकजण सजविलेल्या बैलगाड्यांचे मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी सरसावत होते. गावात ही खबर पोहोचताच गर्दी वाढतच गेली. त्यामुळे काही काळ वाहनांना ट्रॅफिक जॅमचा सामनाही करावा लागला. काहीजणांना बाजाच्या तालावर नाचण्याचा मोह आवरता आला नाही. सुमारे अर्धा तास हा सोहळा चालू होता.
"कोल्हापुरातून या तीन बैलजोड्या आणल्या आहेत. आज त्याची कोंढे, फणसू, गावतळे अशी मिरवणूक काढली आहे."
- मंगेश पालशेतकर
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.