खेड : कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पर्यटकांसह (Tourist) प्रवाशांना नवा जवळचा मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडणारा केबल स्टे ब्रिज (Cable Stay Bridge) उभारण्यात येत आहे. हा पूल साताऱ्यातील तापोळा ते पलीकडे गाढवली आहिरपर्यंत होणार आहे. त्याच्याजवळच खेड तालुक्यातील रघुवीर घाटमार्ग आहे.