esakal | लांजा नगराध्यक्षपदासाठी 'हे' आहेत इच्छुक
sakal

बोलून बातमी शोधा

Candidates For Lanja NagarPanchayat President Election

पक्षाने संधी न दिल्यास अपक्ष लढण्याचीही तयारी काहींनी केल्याने पक्षात बंडखोरी होण्याची शक्‍यता असून बंडखोरी टाळण्यासाठी या सर्वच राजकीय पक्षांसमोर तिकिट वाटप करताना मोठी डोकेदुखी निर्माण होणार आहे.

लांजा नगराध्यक्षपदासाठी 'हे' आहेत इच्छुक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लांजा ( रत्नागिरी ) - येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येथे ओबीसी आरक्षण आहे. भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या चार प्रमुख राजकीय पक्षांकडून प्रत्येकी तिघे किंवा चारजण नगराध्यक्षपदाला इच्छुक आहेत. 

पक्षाने संधी न दिल्यास अपक्ष लढण्याचीही तयारी काहींनी केल्याने पक्षात बंडखोरी होण्याची शक्‍यता असून बंडखोरी टाळण्यासाठी या सर्वच राजकीय पक्षांसमोर तिकिट वाटप करताना मोठी डोकेदुखी निर्माण होणार आहे. लांजा नगरपंचायतीची निवडणूक 9 जानेवारीला होणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे अनेकांच्या आशेवर पाणी फेरले गेले तरीही इच्छुकांची संख्या मोठी आहे.

हेही वाचा - VIDEO : शेणाने सारवलेल्या गाडीतून मुलीची पाठवणी; हेतू काय ? जरूर वाचा 

शिवसेनेकडून डोंगरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

शिवसेनेकडून सुरवातीलाच उपशहरप्रमुख सचिन डोंगरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. आमदार साळवी यांनीच त्यांना तसा शब्द दिला असल्याचे शिवसैनिक सांगतात. तरीही त्यांच्यासह विद्यमान नगराध्यक्ष राजू कुरूप यांचे समर्थक असलेले, व्यापारी कुमार बेंडखळे, बाईत, प्रसाद भाईशेट्ये आदीं इच्छुक आहेत. अपक्ष मात्र सत्ता स्थापनेत शिवसेनेला सहकार्य केलेले पप्पू मुळेदेखील इच्छुक आहेत. शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष उमेदवारी जाहीर करण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा - आर. आर. आबांच्या लेकीला पुत्ररत्न ! 

काँग्रेसकडून चारजण इच्छुक

कॉंग्रेस पक्षाकडून माजी सरपंच राजेश राणे, चंद्रकांत परवडी, बांधकाम व्यावसायिक भगवान ढेकणे आणि अशोक कातकर हे चारजण इच्छुक आहेत. याबरोबरच नगरसेवक दिलीप मुजावर हेदेखील कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत. भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान नगरसेवक ऍड. गांगण तसेच ऍड. सुमंत वाघदरे हे दोघेजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सध्यातरी नावे चर्चेत नसली तरीही तालुकाध्यक्ष बापू जाधव हे ऐनवेळी तगडा उमेदवार देण्याची शक्‍यता आहे. या खेरीज मनसे व अन्य छोटे पक्ष तसेच अपक्षदेखील नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत. 

मागणी रेटून धरली आहे 

नगराध्यक्षपद मिळालेच पाहिजे, यासाठी इच्छुकांनी आपल्या पक्षांकडे आपली मागणी रेटून धरली आहे. काहीजणांनी तर आपल्यालाच उमेदवारी मिळणार आणि आपणच निवडून येणार, या थाटात आतापासूनच प्रचाराला सुरवात केली आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी चढाओढ पाहावयास मिळत आहे. 

प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड 

नगरपंचायतीची निवडणूक 9 जानेवारीला होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या वेळी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षांतील इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. 

loading image