रत्नागिरी : शहरातील एका वकिलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सलग दुसऱ्या आत्महत्येने रत्नागिरीत एकच चर्चा सुरू आहे. कालच एका बँक अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर आज एका वकिलाने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
अमेय अजित सावंत (34) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. आज मध्यरात्री त्यांनी परटवणे येथील राहत्या घरी बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्री उशिरा ही बाब लक्षात आल्यानंतर शहर पोलिसांना याची खबर देण्यात आली.
अमेय सावंत हे बार असोसिएशनचे सदस्य होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेक वकिलांनी त्यांच्या घरी धाव घेतली. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार त्यांच्या गावी मिऱ्या येथे होणार आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.