
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागांमध्ये काजू बी आणि बोंडू खाणाऱ्या किडींचा कधी नव्हे तो इतक्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव काजू पिकांवर दिसून येऊ लागला आहे.
वैभववाडीः अनेक संकटांना सामोरे जात असलेल्या जिल्ह्यातील काजू उत्पादकांसमोर काजू बी आणि बोंडू पोखरणाऱ्या किडीच्या रूपाने नवे संकट उभे राहिले आहे. काजू बीचे (Cashew Nut) संपूर्ण घोसाचेही किड नुकसान करीत असल्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहेच. परंतु, दर्जावर देखील परिणामाची दाट शक्यता आहे. कोणत्याही किटकनाशकाला ही किड नियंत्रणात येत नसल्याने काजू बागायतदार अक्षरक्षः मेटाकुटीस आले आहेत. गेल्या वर्षीपासून या किडींचा उपद्रव अधिक जाणवू लागला असून यावर्षी कहर झाला आहे.