
वैभववाडी : राज्य शासन काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या काजू अनुदान योजनेला महाराष्ट्र राज्य काजू मंडळाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनाही आता अर्ज करता येणार आहेत. हजारो शेतकरी वंचित राहिल्यामुळे फळबागायतदार संघाने मुदतवाढीची मागणी केली होती.