कुडाळ पोस्टातील 92 लाखांच्या गैरव्यवहाराची होणार सीबीआय चाैकशी

कुडाळ पोस्टातील 92 लाखांच्या गैरव्यवहाराची होणार सीबीआय चाैकशी

कुडाळ - येथील पोस्ट गैरव्यवहार प्रकरणाचे सीबीआय चौकशीचे पत्र दाखवल्यानंतर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेले आंदोलन मागे घेतले. या पोस्टमधून संशयित एजंटने 1 ऑगस्टपर्यंत 92 लाख 15 हजारचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले; मात्र ही संशयित महिला सीबीआयच्या चौकशीला सहकार्य करत नसल्याचे पोस्टाचे अधिकारी जी. एस. राणे यांनी सांगितले. 

येथील पोस्ट कार्यालयातील गैरव्यवहार प्रकरणी ठेवीदारांच्या पैशाबाबत एजंट किंवा संबंधित कर्मचारी, अधिकारी जो कोणी दोषी आहे त्यांच्यावर कार्यवाहीच्या दृष्टिकोनातून कोणतीच पावले उचलली जात नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसने पोस्ट कार्यालयात आंदोलन केले. सर्वसामान्यांचे पैसे मिळालेच पाहिजे. जो कोणी गुन्हेगार असेल, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे व सीबीआय चौकशी बाबत जो काय पत्रव्यवहार झाला. तो जोपर्यंत दाखवत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याचा इशारा पक्षाचे प्रांतिक सदस्य अमित सामंत यांनी दिला होता. त्यानुसार दोन तास आंदोलन केल्यानंतर पोस्टाचे अधिकारी राणे यांनी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या उपस्थितीत सीबीआय चौकशीचे पत्र आंदोलनकर्त्याना दाखवले.

सीबीआय पथकाच्या नवीन पोलीस अधीक्षकांनी शुक्रवारी चार्ज घेतला आहे. त्यानुसार ते पुढील तपास करतील. या आंदोलनात मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर, नगराध्यक्ष ओंकार तेली, आबा धडाम, राकेश कांदे, कुणाल किनळेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा पदाधिकारी प्रफुल्ल सुद्रिक, शिवाजी घोगळे, भास्कर परब, हार्दिक शेगले, साबा पाटकर, प्रसाद पोईपकर, संग्राम सावंत, श्री. आकेरकर, श्री. देसाई, साबा पाटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

92 पासबुके बनावट असल्याचे उघड 
राणे यांनी दाखवलेल्या या पत्रात असे नमूद होते की, 1 ऑगस्ट पर्यंत 90 लाख 15 हजाराचा गैरव्यवहार झालेला आहे. 92 पासबुके बनावट असल्याचे उघड झाले. या गैरव्यवहारात 22 एजंटपैकी एकाचे नाव संशयित म्हणून सीबीआयने घेतले आहे; मात्र ही संशयित महिला तपास कामाला सहकार्य करत नसल्याचे यावेळी बोलताना पोस्ट अधिकारी श्री. राणे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com