रत्नागिरीकर तुमच्यावर आता सीसीटीव्हीची नजर

the cctv camera launched in ratnagiri important places in ratnagiri the administration take decision
the cctv camera launched in ratnagiri important places in ratnagiri the administration take decision

रत्नागिरी : संपूर्ण रत्नागिरी शहर लवकरच सीसीटीव्हीच्या निगराणीत येणार आहे. त्या अनुषंगाने शहरातील २६ ठिकाणे निश्‍चित केली असून ८० कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारापासून अंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविली जाणार आहे. या सर्व सीसीटीव्हीचे कंट्रोलरूम तयार करून एका ठिकाणी ठेवून संपूर्ण शहरावर वॉच ठेवता येणार आहे. 

शहरामध्ये यापूर्वीही सीसी टीव्ही बसविले होते. महत्त्वाच्या ठिकाणीच हे सीसी टीव्ही होते. त्यासाठीचे काम एका एजन्सीकडे होते. पोलिस दलाच्या मागणीवरून जिल्हा नियोजन समितीतून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता; मात्र देखभाल दुरुस्तीअभावी सीसीटीव्ही अनेक दिवस बंद होते. प्रसारमाध्यमांनी त्यावर प्रकाश टाकल्यानंतर त्याची तात्पुरती दुरुस्ती झाली; मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या, अशी स्थिती आहे.

तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मारुती मंदिर परिसरात गोलाकार फिरणारे डे-नाईट सीसी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याचा कंट्रोल वाहतूक पोलिसांकडे आहे. मात्र, नूतन पोलिस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी शहर सीसीटीव्हीच्या निगराणीच्या दृष्टीने योजना आहे. शहराचा सर्व्हे झाला. प्राथमिकदृष्ट्या २६ स्पॉट निश्‍चित केले आहेत. या स्पॉटवर डे-नाईट सीसी टीव्ही कॅमेरे बसविणार आहेत. त्यासाठी एक नियंत्रण कक्ष बनविण्याचा आराखडा तयार केला जाणार आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याच्यादृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे. 

ही आहेत ठिकाणे

साळवी स्टॉप, नवलाई मंदिर नाचणे, मारुती मंदिर, उद्यमनगर, मजगाव तिठा, शासकीय विश्रामगृह, जेलनाका, सिव्हिल हॉस्पिटल, जयस्तंभ, रामनाका, भुतेनाका, भाटे चेकपोस्ट, परटवणे, सावरकर चौक, हिंदू कॉलनी, मांडवी बिच, मिरकरवाडा, काजरघाटी तिठा, विमानतळ, पंधरामाड, भाटे बीच, गोखले नाका, कर्ला तिठा, आरटीओ ऑफिस, जे. के. फाईल्स ही ठिकाणे निश्‍चित केली आहेत. याबाबत बैठक घेऊन निर्णय होणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com