
कणकवली : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी केंद्राने पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्यांना महामंडळातील त्यांचा हिस्सा सोडावा किंवा महामंडळाला हिस्सेवारीनुसार निधी द्या, असे निर्देश दिले आहेत.