चालकांनो सावधान! कायदे मोडणे पडणार महागात

नवीन केंद्रीय मोटारवाहन कायद्याची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे.
konkan
konkanesakal
Summary

नवीन केंद्रीय मोटारवाहन कायद्याची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे.

रत्नागिरी : वाहन चालकांनो सावधान, आता वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, विना परवाना वाहन चालवणे, फॅन्सी नंबरप्लेट बसवणे, बेदरकारपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे चांगलेच महागात पडणार आहे. नवीन केंद्रीय मोटारवाहन कायद्याची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याची अधिसूचना जारी झाली. मोबाईलवर बोलणाऱ्या दुचाकीस्वाराला एक हजार रुपये, चारचाकी वाहनचालकांला दोन हजार आणि अन्य वाहन चालकाला चार हजार रुपये दंड होणार आहे. वाहनांना परावर्तक (रिफ्लेक्टर) नसणे, फॅन्सी नंबर प्लेट बसवणाऱ्यांना एक हजार तर लायसन्स नसणाऱ्याला पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना जरब बसवण्यासाठी भरमसाठ दंडाची तरतूद असलेल्या केंद्रीय मोटारवाहन कायद्याची अंमलबजवाणी महाराष्ट्रातही करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी १० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. लायसन्स (अनुज्ञप्ती) नसल्यास वाहन चालवणाऱ्याकडून पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

konkan
शेतीची दैना... राज्यात द्राक्षाला 10 हजार कोटींचा फटका!

महाराष्ट्रात शासनाने कायद्याला विरोध केला. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नवीन मोटारवाहन कायद्याला तात्पुरती स्थगिती दिली होती. परंतु राज्यात वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन आणि वाढते अपघात पाहता परिवहन विभाग नवीन कायद्याची अंमलबजवाणी करण्यासाठी आग्रही होता. त्यानुसार १ डिसेंबर २०२१ ला अधिसूचना जाहीर केली आहे. यापूर्वी दंडाची ही रक्कम ५०० रुपये होती. तीन वर्षात दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड होणार आहे. अशाच प्रकारचा दंड मोबाईलवर बोलताना वाहन चालवल्यासही होणार आहे. परावर्तक (रिफ्लेक्टर) नसणे, फॅन्सी नंबरप्लेट बसवणे याना यापूर्वी २०० रुपये दंड होता. तो १ हजार रुपये करण्यात आला आहे.

"वाहनधारकांकडून जादा रक्कम वसूल करून त्यांना त्रास देणे हा त्यामागील उद्देश नाही तर दंडाच्या रकमेच्या भितीपोटी मोटारवाहन कायद्याचे पालन केले जाईल, हाच याचा मुख्य उद्देश आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे."

- सुबोध मेडसीकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी

konkan
'नवरा हवा की मटण?' यापैकी एक निवड, बायकोला चक्क नवऱ्याचा इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com