'योग्यवेळी बोलेन, पण सपाटून बोलेन' : उदयनराजेंचा इशारा

निलेश मोरजकर
Monday, 23 November 2020

सूचक इशाऱ्यामुळे भविष्यात राज्य सरकारला उदयनराजे यांच्या चौफेर टीकेला तोंड द्यावे लागेल.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेबद्दल 'आता नाही, योग्यवेळी बोलेन, पण सपाटून बोलेन' असा सुचक विधान राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बांदा (सावंतवाडी) येथे पत्रकारांशी बोलताना केले. त्यांच्या सूचक इशाऱ्यामुळे भविष्यात राज्य सरकारला उदयनराजे यांच्या चौफेर टीकेला तोंड द्यावे लागेल.

गोवा येथून सातारा येथे जाताना बांदा येथे मराठा समाज अध्यक्ष राजाराम सावंत यांच्या निवासस्थानी घेतलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मराठा समाजाचे स्थानिक पदाधिकारी व भाजपचे नेते उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेबाबत त्यांना पत्रकारांनी छेडले असता सुरुवातील त्यांनी बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा - रत्नागिरीतील अपघातात इचलकरंजीच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू
 

मात्र जाता जाता त्यांनी मराठा आरक्षणाबाबत 'योग्यवेळी बोलेन, पण सपाटून बोलेन' असे सूचक विधान केले. त्यामुळे भविष्यात मराठा आरक्षण प्रश्नावरून राज्य सरकार व उदयनराजे भोसले यांच्यात शाब्दिक युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chahtrapati udayan raje bhosale said on the topic of maratha arkahsn in shindhudrug